तुळजापूर- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कुस्ती आखाडा व आखाड्यात सोईसुविधा साठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी तुळजापूर तालुका कुस्ती तालीम संघ वतीने आ. राणाजगजितसिंहज पाटील यांना निवेदन देवून केली.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी इंजिनीअरींग कॉलेज परिसरात कुस्तीचा आखाडा असून सदर आखाडा हा खुप दिवसापुर्वी तयार केलेला आहे. नवीन आखाडा तयार करे पर्यत त्यामध्ये मल्लांना सरावासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सदरचा आखाडा हा पुर्णपणे खुला असून त्यावरती कोणत्याही प्रकारचे छत उपलब्ध नसल्या कारणाने यावर छत टाकुन द्यावा म्हणजे मल्लांना सराव करणे शक्य होईल आपल्या तालुक्यातील कुस्ती मल्ल हे आखाडे व सुखसोई उपलब्ध होत नसल्या कारणाने कोल्हापुर तसेच इतर तालीम असलेल्या जागी जात आहेत. त्यामुळे तुळजापूर तालुका कुस्ती तालीम संघाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे मारुती वडार उपमहाराष्ट्रा केसरी अकुंश ढेरके, रमेश लोंढे, शाहु मगर, निलेश रोचकरी, बबलु धनके, सचिन घोगरे, मेघराज तेलंग, आनंद रोचकरी, ओम मगर, बालाजी विठ्ठलकर, सुंदर जवळगे, ओंकार कुतवळ यांनी मागणी केली आहे.