धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक, क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी डॉ. अनार साळुंके, तर सचिवपदी डॉ. मीना जिंतूरकर यांची 2023-24 साठी निवड झाली असून नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येत्या 9 जूलै 2023 रोजी परिमल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. अनार साळुंके या माजी प्राचार्य आहेत. तर डॉ. मीना जिंतूरकर या स्त्रीरोग तज्ञ आहेत. रोटरी प्रांत 3132 हा महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा आणि 91 क्लबचा मिळून बनलेला आहे.
पर्यावरण, अंधत्व निर्मूलन, माता-किशोरवयीन मुलींसाठी वर्कशॉप्स, माती पून:निर्मितीसाठी शेतकर्यांसोबत काम, परिवर्तन ग्राम, युवकांसाठी अनेक उपक्रम त्यांनी 2023-24 या वर्षांसाठी हाती घेतले आहेत. रोटरी क्लब उस्मानाबादच्या गेल्या 33 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि सचिवपदी दोन्ही महिला व कार्यकारिणीत सुद्धा जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे. या सर्वांना प्रांतपाल रो. स्वाती हेरकल ह्यांच्या सारख्या बहूआयामी व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे.