धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील मुळेवाडी शिवारातील किणी- तेर शेत रस्ता व हिंगळजवाडी ते मुळेवाडी-ढोकवाट शेत रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे दि. 11 जुलै रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की धाराशिव तालुक्यातील मुळेवाडी शिवारातील किणी- तेर व हिंगळजवाडी ते मुळेवाडी ढोकवाट शेत रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात यावा. तेर-किणी या शेत रस्त्याचे तेर शिवारापर्यंत काम झाले असून उर्वरित रस्ता मुळेवाडी शिवारातून जात आहे. मात्र काही शेतकर्‍यांनी मनमानी कारभार करून तो रस्ता अडविला आहे. हे रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र अद्यापपर्यंत हे रस्ते अतिक्रमण मुक्त केलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यासह इतर रस्ते ही अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर छावाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, बालाजी शिंदे, अमोल गोरे, शेषेराव कन्हेरे, अमृतराव गोरे, शिवाजी गोरे, लक्ष्मण नाईकनवरे, भारत नाईकनवरे, दत्तात्रय मुळे, बालाजी भोसले, अशोक गोरे, संजय थोडसरे, किशोर वराळे, सुंदर गोरे, बाळासाहेब मुळे, मोहन पराळे, कुंदन थोडसरे, बालाजी थोडसरे, प्रवीण राठोड, उद्धव भोसले, प्रभाकर भोसले, नाना गोरे, दत्ता भोसले, रौफ शेख, खलील शेख, काका मुळे आदींच्या सह्या आहेत.


 
Top