धाराशिव (प्रतिनिधी)- भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वेगाने वाढत आहे. परंतु कामाच्या संधी उपलब्ध होत नाहीत म्हणून देशांमध्ये भांडवल प्रदान तंत्राच्या ऐवजी श्रमप्रदान तंत्राचा वापर करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा.डॉ.मारुती लोंढे यांनी केले.

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 11 जुलै 2023 रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रा.डॉ. मारुती लोंढे बोलत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. माधव उगीले यांनी केले. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. जीवन पवार, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी.एस. सुर्यवंशी, प्रा.डॉ. डी.वाय साखरे आणि  महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top