धाराशिव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक सेट परीक्षेत मराठी विषयात प्रा सारिका सूर्यकांत नलवडे-निंबाळकर या उत्तीर्ण झालेले आहेत. 

या यशाबद्दल पीएचडीचे संशोधक मार्गदर्शक प्रा. डॉ शिवाजीराव देशमुख, प्रा डॉ अरविंद हंगरगेकर, प्रा डॉ अमर निंबाळकर, रामराजे व नितीन निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक अनघा गोडगे, पत्रकार संतोष जाधव, डॉ संजय नलवडे, संदीप व आदेश नलवडे, यशश्री क्लासेस, इन्फोटेक, वसतीगृहाचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. यशश्री क्लासेसचे अमोल निंबाळकर यांच्या त्या पत्नी असुन त्यांनी आजवर मराठी भाषेत अनेक लिखाण, संशोधन केले आहे. ’धाराशिव जिल्ह्यातील कवियत्रीच्या काव्यलेखनातील स्त्री जाणिवा : एक अभ्यास ’ या विषयावर त्या पीएचडी करीत आहेत.


 
Top