धाराशिव (प्रतिनिधी)-प्राचार्य व प्राध्यापक डॉ.शेख गाझी ,फार्मासुटिकल केमिस्ट्री विभागाचे मार्गदर्शक की, जे गेल्या 21 वर्षांपासून अविरत अध्यापनांचे कार्य करत असून ते सध्या आर.पी.औषधानिर्माणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत आहेत.त्यांच्या नावे 50 रिसर्च पेपर आहेत. तसेच 60 पेक्षा जास्त शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले आहेत. तसेच ते विविध फार्मसी जर्नलच्या संपादकीय मंडळावर कार्यरत आहेत.

त्यांनी 32 विध्यार्थ्यांना एम.फार्म. प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले आहे. 6 विद्यार्थ्यांना पी.एचडी साठी मार्गदर्शन करत आहेत.ते गेले अनेक महिन्यापासून नॉवेल डिझाइन ऑफ ओईटमेंट फीलिंग मशीन या वर कार्य करत होते की ज्याला पेटंट अथॉरिटी ऑफ इंडिया ने मान्यता दिली. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन आणि सत्कार केला.आणि सांगितले की आमच्या महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब आहे,आणि तुम्ही असेच कार्य करत रहा व महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा पुढे घेऊन जा अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस मधील सर्व प्राचार्य व इतर कर्मचारी यांनी देखील अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 
Top