कळंब (प्रतिनिधी)- तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जि. धाराशिव येथे माजी मंत्री ओमप्रकाश (बच्चुभाऊ) कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांना वही, पेन, सिस्पेन्सिल हे शैक्षणिक साहित्य व केळी वाटप करून मूकबधिर मुलांच्या चेहर्‍यावर आनंद द्विगुणित केला. 

यावेळी कार्यक्रमाला प्रहार संघटना कळंब तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, कळंब तालुका प्रहार उपाध्यक्ष अशोक कुलकर्णी, तालुका  सचिव  संतोष घुले, तालुका संघटक धनंजय पारेकर, महेश करंजकर, शेख सादिक, रावसाहेब राऊत, आकाश शेळवने, अनिल मिसाळ, मदने, बांगर इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेचे मुख्याद्यापक बालाजी जाधवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आश्रुबा कोठावळे यांनी मांडले. तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित मोठया संख्येने होते.

 
Top