औसा (प्रतिनिधी) - रूपामाता उद्योग समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमेचा उत्सव औसा शहरातील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला. 

माणसाच्या जीवनामध्ये गुरूला अन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु शिवाय आपल्या प्रगतीचा मार्ग गाठता येत नाही, म्हणून गुरुजनांचा सत्कार करून रूपामाता उद्योग समूहाने गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला. दि. 03 जुलै रोजी वीरभद्रेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे, मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरणाप्पा जलसाकरे, अजीम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक माशाळे, जिजामाता विद्यालयाचे नागनाथ सोमवंशी, उदासीन मठाचे हभप भागवत महाराज उदासीन, शिवाजी विद्यालयाचे मलवाड, विवेकानंद विद्यालयाचे लोखंडे, अजीम हायस्कूलचे परवीन शेख, आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य शेख  निजाम यांचा सत्कार रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेव विभागाचे प्रमुख सतीश लांडगे, शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले, विकास औटी, पृथ्वीराज चव्हाण, दिपक ढोक, प्रशांत सावंत, श्रीराम मोरे आणि अमर सावंत यांनी केला.

 
Top