धाराशिव (प्रतिनिधी) - दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनअक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जरिनखानचा, पोलीस कोठडीत खुन करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा कलम  अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस तात्काळ अटक करुन बडतर्फ करण्यात यावे. तर जरिन खानच्या कुटुंबास  लाखाची शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील अक्षय भालेरावच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जिव घेणा हल्ला करणार्‍या आरोपींना कडक शासन करण्यात यावे. तर लातूर तालुक्यातील रेणापूर येथील मातंग बांधवाचा खुन करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक शासन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते फारूख अहमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे-पाटील, उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, जिल्हा प्रभारी ऍड रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, उपाध्यक्ष अमोल लांडगे यांनी केले. यावेळी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानवराव, धनंजय सोनटक्के, उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मण खुने, सुशिल बनसोडे, जिल्हा संघटक विनोद अंबेवाडीकर, सहसचिव सोमनाथ नागटीळक, जिल्हा प्रवक्ते डॉ. शहाजी चंदनशिवे, भाऊसाहेब अंदुरकर, कुंदन वाघमारे, शेखर बनसोडे आदीसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top