धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या तीन वर्षापासून जिल्हयात जून महिन्यातच 80 ट्नके पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होत होती. यंदा मात्र जुलै महिन्याची 13 तारीख उजाडली. तरी आता पर्यंत पेरणी योग्य पाऊस न झाल्याने पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे पाच लाख चार हजार हे्नटर पैकी एक लाख 69 हजार हे्नटर्सवरच 33.58 टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली. अद्यापही तीन लाख 35 हजार शेत जमीन पेरणी अभावी पडून आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी आता पर्यंत 118.6 मिमी पाऊस पडला होता. त्याची टक्केवारी 71.6 ट्नके पाऊस झाला होता. यंदा मात्र आता पर्यंत 15.7 टक्के पाऊस झाला असल्याने पेरणी ही कमी झाली. मात्र अद्यापही पावसाचा पत्ताच नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. सध्या  पेरणी योग्य पाऊस न पडल्यामुळे अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

धाराशिव तालु्नयातील पेरणी क्षेत्र 1 लाख 4 हजार हे्नटर, पेरणी झालेले 34 हजार 700 हे्नटर  , टक्केवारी 33, पावसाची टक्केवारी 15.04 टक्के. तुळजापूर तालु्नयातील पेरणी क्षेत्र 89 हजार 8 हे्नटर, पेरणी झालेले 37 हजार 300 हे्नटर, टक्केवारी 42, पावसाची टक्केवारी 16 टक्के. परंडा तालु्नयातील पेरणी क्षेत्र 29 हजार 500 हे्नटर, पेरणी झालेले 3 हजार 200 हे्नटर , टक्केवारी 11, पावसाची टक्केवारी 16.09 टक्के. भूम तालु्नयातील पेरणी क्षेत्र 49 हजार 500 हे्नटर, पेरणी झालेले 29 हजार 600 हे्नटर, टक्केवारी 60, पावसाची टक्केवारी 15.00 टक्के. कळंब तालु्नयातील पेरणी क्षेत्र 75 हजार 300 हे्नटर, पेरणी झालेले 32 हजार 400 हे्नटर, टक्केवारी 43, पावसाची टक्केवारी 16.00 टक्के. वाशी तालु्नयातील पेरणी क्षेत्र 39 हजार 300 हे्नटर, पेरणी झालेले 18 हजार 700 हे्नटर , ट्नकेवारी 48, पावसाची टक्केवारी 13.01 टक्के. उमरगा तालु्नयातील पेरणी क्षेत्र 75 हजार हे्नटर, पेरणी झालेले 10 हजार 200 हे्नटर, टक्केवारी 14, पावसाची टक्केवारी 15.07 टक्के. लोहारा तालु्नयातील पेरणी क्षेत्र 41 हजार 300 हे्नटर, पेरणी झालेले 3 हजार 100 हे्नटर , टक्केवारी 08, पावसाची टक्केवारी 09.02 टक्के. असे एकूण जिल्ह्यात पेरणी क्षेत्र 5 लाख 4 हजार हे्नटर क्षेत्र असून, जिल्ह्यात अद्यापपर्यंत पेरणी केलेले क्षेत्र 1 लाख 69 हजार हे्नटर आहे. तर जिल्ह्याची एकूण टक्केवारी 33.58 टक्के इतकी पेरणी झाली आहे. तसेच अद्यापपर्यंत जिल्ह्यात 15.00 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे पावसाअभावी उडिद व मूग पेरणी करण्याचा अवधी निघून गेला आहे.


 
Top