धाराशिव (प्रतिनिधी)- शैक्षणिक, साहित्य, क्रिडा, चित्र-शिल्प, नृत्य- नाट्य ,गायन - वादन विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींचे सन्मान करणारी एकमेव संस्था कलाविष्कार अकादमी धाराशिव तर्फे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळांनी गाथे मधीलच एक अभंग व एक गवळण नियोजित वेळेत सादर करायची आहे. तरी इच्छुक मंडळांनी रविवारी दि. 02 जुलै रोजी दुपारी चार वाजता दत्त मंदिर सभागृहात स्वता:च्या साहित्यासह सहभागी व्हावे असे आवाहन कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे, सचिव शेषनाथ वाघ यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.


 
Top