धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संजय घोडके प्रथम प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी संजय घोडके,  त्यांचे वडील सुभाष घोडके आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. विद्या देशमुख यांचे अभिनंदन केले.

संजय घोडके यांनी अतिशय परिश्रमातून यश संपादन केलेले आहे. त्यांचे वडील सुभाष घोडके हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत आहेत. या यशाबद्दल संजय घोडके यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. विद्या देशमुख,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी.एस.सूर्यवंशी, डॉ.एस.एस.फुलसागर, डॉ.संदीप देशमुख, डॉ.मंगेश भोसले, डॉ.मारुती लोंढे, प्रा.अतुल देशमुख उपस्थित होते.


 
Top