धाराशिव (प्रतिनिधी)- संभाजी भिड हा वादग्रस्त विधाने करून सातत्याने दंगली घडवण्याचे काम करत असतो भारत देशाला मिळाल्याले स्वातंत्र्य तिरंगा ध्वज, जन- गण- मन-हे राष्ट्रगीत आपले नाही असे आक्षेपार्ह विधान करून भारत देशाचा व देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महापुरुषांचा अवमान केला आहे म्हणून संभाजी भिडे वर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले आहे. यापूर्वी पण त्याने असे अनेक विधाने करून समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे. तसेच भीम आर्मी पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ला म्हणजे आंबेडकरी चळवळ संपवण्याचे कटकारस्थान आहे. या  हल्लेखोरांचा तात्काळ तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, धाराशिव तालुका अध्यक्ष संपत सरवदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मस्के, गौतम धावारे, जगदीश कार्लेकर, राहुल कांबळे, के. डी.साळुंखे, आर. पी. आय. (आठवले) पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top