धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील धाराशिव आगारातील चालक नामदेव राठोड हे 30 जून 2023 रोजी नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. यानिमित्ताने धाराशिव आगाराच्या वतीने त्यांचा भरपेहराव व भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

नामदेव राठोड यांनी धाराशिव आगारात तब्बल 25 वर्षे विना अपघात सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त धाराशिव आगारातील डेपो मॅनेजर संतोष कोष्टी यांच्या हस्ते भरपेहराव व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आगारातील एसटी कामगारांनीही त्यांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. सत्कार सोहळ्याला सुरेश शेळके, सुरेश वाघे, अजय घोडके, दीपक जाधव, विद्याधर क्षीरसागर, शाहुबाई राठोड, आकाश राठोड यांच्यासह राठोड कुटुंबीय परिवहन महामंडळातील चालक, वाहक, मेकॅनिक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top