तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेचे उद्घाटन बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड. विक्रम साळुंके यांच्या हस्ते  करण्यात आले. 

यावेळी विश्व हिंदू परिषद विभाग धर्माचार्य प्रमुख श्रीकृष्ण धर्माधिकारी,विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजयकुमार वाघमारे,विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष अॅड .गजानन चौगुले, विश्व हिंदू परिषद शहर मंत्री संतोष पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तेर येथील विश्व हिंदू परिषद शाखा अध्यक्षपदी अभिजीत सराफ,उपाध्यक्ष सुजित झिंजे,मंत्री शिवाजी पडुळकर,सहमंत्री बालाजी पांढरे,मठ प्रमुख अभिषेक बैरागी, सेवा प्रमुख वैभव पाडुळे यांची निवड करण्यात आली. तर बजरंग दल शाखा तेरच्या संयोजकपदी विठ्ठल कदम, सहसंयोजक पप्पु नाईकवाडी ,बालाजी कोकरे, गोरक्षा प्रमुख सौरभ जाधव, मंगेश माने, मयूर तापडे, किरण ठोंबरे ,सुरक्षा प्रमुख  अक्षय पांचाळ, गोविंद कदम, निखिल जाधव, बालाजी सुपनावर,आखाडा प्रमुख  तुकाराम  पांढरे, राहुल शिंदे, प्रीतम ठोंबरे, सोमनाथ माने, नागेश ठोंबरे, महाविद्यालयीन मल्हार सलगर ,पृथ्वी कदम, आरती प्रमुख अनिकेत नाईकवाडी, दत्ता महाराज यांची निवड करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top