धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत सार्थसत्य येथे जिल्हा संस्कार भारती समितीच्या वर्षभराच्या अनिवार्य कार्यक्रमाचा भाग म्हणून पहिला अनिवार्य कार्यक्रम गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. ध्येयगीतांनी सुरुवात होऊन संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री डॉ. हरिभाऊ वाकणकर प्रतिमेसह नटराज पुजन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ जिल्हा संगीत विधा प्रमुख सुरेश वाघमारे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी शहर संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर सदस्य सत्यहरी वाघ उपस्थित होते. कार्याध्यक्ष अनिल ढगे यांनी गुरुपोर्णिमा नटराज पूजन याबाबत संस्कार भारतीचे घोष-वाक्य,’सा कला या विमुक्तये’हे आहे. त्यानुसार कलेच्या उपासनेतून आत्मोन्नती साधता येते.भारतीय संगीताच्या साधनेस म्हणूनच नादब्रह्माची उपासना असं म्हटलं गेलं आहे. 

संगीत है शक्ती ईश्वर की 

हर सूर मेबसे हैं राम’ 

असं एका दोह्यात म्हटलं आहे. 

’शिवोहम शिवोहम’या प्रचितीबद्दल बोलायचं तर, आपल्या संस्कृतीचे,’अद्वैत’तत्वज्ञान हे चराचरात ईश्वर व्यापलेला असून उपासनेद्वारे आत्मा हा परमेश्वर प्राप्ती करून घेतो तेव्हा त्यास ईश्वर व तो स्वतः एकरूप असल्याची प्रचिती येते.ती अनुभूती म्हणजे,’शिवोहम शिवोहम. देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेण संस्थितः’हे वचन सर्व जीवांच्या ठायी असणारी शक्ती हे देवीचंच रूप आहे.हेच सांगणारं आहे. असे महत्व विशेष केल्यानंतर छोट्या बैठकीत नुतन कार्यकारिणी पुढील वर्षभराचे समाजहिता य संस्कार प्रबोधन कार्यक्रमाचे नियोजन चर्चा होऊन प्रसा यदानाने सांगता झाली.


 
Top