धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठींबा आहे. त्यांच्या विचारांची देशाला गरज असल्यामुळे आम्ही शरद पवार साहेबांसोबत असल्याचे शपथपत्र जिल्हा व तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सादर केले आहे. मंगळवार, 3 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत ही शपथपत्रे संकलित करुन पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आली. 

आम्ही शरद पवार साहेबांसोबतच असून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या आदर्शावर आणि तत्त्वावर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो. मी असेही सांगतो की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या व आ.रोहीत दादा पवार यांच्या नेतृत्वार माझा मनापासून बिनशर्त पाठिंबा आहे असे प्रतिज्ञापत्र युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी आज सादर केली. ही शपथपत्रे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर भैय्या घोडके, शहराध्यक्ष आयाज शेख, युवक प्रदेश सचिव रोहित भैया बागल, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार, माजी नगरसेवक बाबा मुजावर, युवा नेते रणवीर इंगळे, पंकज भोसले, पृथ्वीराज मुळे, कुणाल कर्णवार, युवक तालुका सरचिटणीस शिवशांत काकडे, प्रशांत सोनटक्के अनिकेत साबळे आदीसह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 
Top