तुळजापूर (प्रतिनिधी)-जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2023 मध्ये सहावी वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांनी गुलाब पुष्प, पेन, फुगे, चॉकलेट, तिलक लावून देऊन जंगी स्वागत करण्यात आले .याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

याप्रसंगी प्राचार्यांनी शैक्षणिक बाबींचा आढावा घेऊन हे विद्यालय संपूर्ण भारतामध्ये कसे अग्रेसर बनत चाललेला आहे त्याचा आलेख पालकांच्या समोर मांडला. तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शैक्षणिक सुविधा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कशा पद्धतीने विद्यालयामध्ये राबवले जातात याची इथंभूत माहिती पालकांना सांगितले. यावेळी पालक देखील विद्यालयातील सजावट, परिसर, सदन, शिस्त, भोजन व्यवस्था, वर्ग, पाणी, निसर्ग सौंदर्य, स्वच्छता, त्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्य हे पाहून समाधान व्यक्त केले. यानंतर सर्व सहावीच्या विद्यार्थ्यांची विद्यालय परिसरामध्ये  फेरी काढून विद्यालयाच्या सर्व परिसर दाखविण्यात आला. या कार्यक्रमासाठी एस .

आर. गजम, सुजाता कराड, आर.एम.अलसेट, जाधव हरी यांनी विशेष पुढाकार घेतला.

 
Top