धाराशिव (प्रतिनिधी)- अजितदादा पवारांनी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की, अजितदादा म्हणजे बिभिषण होते, गेले ते बरेच झाले, असे मत नोंदवले आहे.
बिभिषणाने सत्य आणि धर्माच्या बाजूने लढणा-या प्रभू श्रीराम यांच्या बाजूने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला होता असा रामायणातील संदर्भ आहे. म्हणजेच आता अजितदादांनी घेतलेला निर्णय हा सत्य आणि धर्माच्या बाजूने घेतला आहे हे नानाभाऊंच्या मताने अधोरेखित झाले आहे अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांनी केली आहे.