धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष तथा धाराशिवचे सुपुत्र अॅड. मिलिंद पाटील यांची केंद्र सरकारच्या दिल्ली येथील प्रोजेक्ट अॅन्ड डेव्हलपमेन्ट (पीडीआयएल) कंपनीच्या संचालक पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने अॅड. मिलींद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे विपीन गंधोरकर, महेश पाठक, संतोष बडवे, धनंजय जेवळीकर, राकेश कुलकर्णी, डॉ. गजानन कुलकर्णी, अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, गजानन घुगीकर आदिंची उपस्थिती होती.