तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात सध्या खाजगी क्लासेसचा सुळसुळाट वाढला असुन सध्या शहरात साने गुरुजीची जागा नाणे गुरुजीनी घेतल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रासह, पालक वर्गात होत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात सध्या बोळात खाजगी क्लासेस आहेत. खाजगी क्लासेसवाल्यांकडे वाहन तळाची सोय नाही. क्लासेसमध्ये मेंढर कोंडल्या सारखे बसवुन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
क्लासेस फिस तर गोरगरीब विध्यार्थांना परवडणारी नाही शहरात खाजगी क्लासेस वाल्याने चक्क आपल्या क्लासेस मध्ये जादा गुण मिळवलेल्या गुणवंत विध्यार्थांचे फोटो असलेले डीझीटल चक्क शहरातील विविध शाळेच्या लगत लावले आहेत. यावर आमच्या क्लासेसचा विध्यार्थीं शाळेत प्रथ आल्याचे फोटो टाकुन त्यावर मजकुर लिहिल्याने शिक्षण प्रेमी मधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नाणे घेवुन शिकवणारे नाणे गुरुजी साने गुरुजी कसे झाले? असा सवाल करीत आहेत. आमच्या क्लासेसचा विध्यार्थीं शाळेत प्रथम ही जाहीरात शाळेत शिकवणा-या शिक्षक वृदांना तसेच त्यांच्या पालकांना मनाला क्लेशदायक ठरणारी आहे. कारण पहिले ते दहावी पर्यत शिकवणार शिक्षक त्याचा साठी झटणारे पाल्याचे आईवडील एक वर्ष शिकवणीत पैसे घेऊन शिकवणारे हे नाणे गुरुजी साने गुरुजी कसे बनले असा सवाल सर्वसामान्यातुन विचारला जात आहे. एकदंरीत तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मोठमोठा शहरातील धर्तीवर क्लासेसचा धंदा जोरात सुरु असुन कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत आहे.