धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालय, उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालय उस्मानाबाद येथे अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा स्त्री रोगतज्ञ महिला विंगच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. डॉक्टर्स-डे निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी स्त्रीरोगतज्ञ महिला विंगच्या अध्यक्ष डॉ. ललीता स्वामी, डॉ. स्मिता सरोदे-गवळी, डॉ. अनुराधा गरड, डॉ. सुशीलकुमार सरडे, डॉ. परवीन पल्ला, डॉ. नीता पौळ, डॉ. शैलजा मिटकरी, डॉ. सोनाली पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संजय मुंडे, अधिपरिचारिका संगीता मराठे, मृणाल देशपांडे आदी स्त्री रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होेते.


 
Top