तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेस मधुन प्रवास करताना दिव्यांग (अपंग) लाभार्थ्यांस मुळ दिव्यांग वैश्विक (आँनलाईन) ओळखपत्राच्या आधारे राज्य परिवहन प्रवासामध्ये सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इतर तसेच बनवाट ओळखपञ लाभार्थींची गोची होणार आहे व ख-या दिव्यांगाना याचा फायदा होणार आहे.
आपण अद्यापही काही लाभार्थ्यांस मुळ दिव्यांग वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले नसल्याने सदर लाभार्थ्यांकडून शासनाच्या संकेत स्थळावरुन प्राप्त करुन घेतलेले वैश्विक ओळख पत्राची रंगीत झेरॉक्स प्रत रा.प. प्रवासामध्ये सवलत मिळणे करीता ग्राहय धरावे किंवा कसे ? याबाबत मार्गदर्शन करणे बाबत कळविले होते. अपंग व्यक्ती हक्क अधिनियमच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र व अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. ज्या लाभार्थ्यास मुळ दिव्यांग वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले नाही अशा लाभार्थ्यांकडून शासनाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घेतलेले वैश्विक ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स प्रत रा.प. प्रवासामध्ये सवलती करिता ग्राह्य धरता येणार नाही कारण बनावट वैश्विक ओळखपत्र तयार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब, दिव्यांग लाभार्थ्यांस मुळ दिव्यांग वैश्विक ओळखपत्राच्या आधारे रा.प. प्रवासामध्ये सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. असा आदेश गुरुवार दि 28 जुलै रोजी
महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या स्वाक्षरी निशी काढण्यात आला आहे.