धाराशिव (प्रतिनिधी)-ठाकरे सरकारने सततच्या पावसाच्या नुकसानी पोटी छदामही मदत कधी केली नाही, त्यामुळे या लोकप्रतिनिधींना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असे मत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी अथवा इतर कोणत्याही सरकारने आजवर सततच्या पावसाने झालेल्या नुकसानी पोटी अनुदान दिले नाही. यापूर्वी केवळ अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटीच एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकर्‍यांना मदत दिली जात होती. मात्र महायुती सरकारने यापुढे जाऊन सतच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे निकष निश्चित केले व शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे. ठाकरे सरकारने घोषित केलेल्या प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम देखील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने दिली नाही, ती रक्कम देखील महायुती सरकारने शेतकर्‍यांना दिली आहे.  विविध माध्यमातून शेतकर्‍यांना सातत्याने सरकारकडून मदत केली जात आहे.

 
Top