धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दि. 1 जुलै रोजी कन्हेरवाडी ता. कळंब येथे बैठक घेतली.

यावेळी त्यांनी शेतीतील प्रश्न, विजेचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नांवर चर्चा केली.गावकर्‍यांनी देखील बरेच प्रश्न यावेळी मांडले. विशेष करून खामगाव - पंढरपूर हा रोड कन्हेरवाडी पाटी येथे अपूर्ण आहे. आजपर्यंत अनेक लोकांचा त्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासन व शासन तो गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्याकामी आपण लक्ष घालावे, अशी विनंती गावकर्‍यांनी संजय पाटील दुधगावकर यांना केली. लवकरच हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द यावेळी  दुधगावकर यांनी दिला.

या बैठकीचे प्रास्ताविक प्रा.विलास जगताप यांनी तर आभार श्रीकांत मिटकरी यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादीचे वक्ता विभाग तालुकाध्यक्ष प्रा.रणजित वरपे, विशाल विलास मिटकरी, चंद्रकांत प्रल्हाद जाधव, सुभाष रावसाहेब कवडे, धर्मराज नरहरी, कवृडे सुरेश, नरहरी कवडे, विलास निवृत्ती जगताप, वसुदेव नामदेव सावंत, जालींदर भैरू कवडे, दत्तात्रय तुकाराम शिंदे, वैजीनाथ(दादा)कवडे, दयानंद महादव जग्ताप, रामभाऊ सोपान कवडे, कमलाकर नारायण कवड, बाळासाहेब माणीक कवडे, पांडुरंग सदाशीव जाधव, विठ्ठल धोंगडे, विश्वनाथ तुळशीराम गायकवाड, श्रीकांत बाबुराव मिटकरी, प्रसाद विकास कवडे, अरुण सावंत, बादल सावंत, अनंत (मेजर) कवडे, बाळासाहेब बापूराव कवडे, अंगद माणीकराव कवडे, श्रीनाथ बाबुराव मिटकरी, रणजीत ओमन, आनंद मिटकरी आदी उपस्थित होते.

 
Top