धाराशिव (प्रतिनिधी)-रोटरी क्लब उस्मानाबाद व धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी येथे किशोरी विकास प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थीनींना आरोग्य, मासिक पाळीच्या समस्या, शिक्षणाचे महत्त्व व सर्वांगीण विकास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
भावसार महिला मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ रेखा ढगे, रोटरी क्लब धाराशिवच्या अध्यक्ष डॉ, अनार साळुंके, डॉ.शिल्पा हंबीरे, फेडरेशनच्या उपाध्यक्ष नीता कठारे यांनी वरील मार्गदर्शन केले. सहशिक्षिका शितल झिंगाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सुत्रसंचलन केले.