धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन सोमवार दि. जुलै रोजी पाटोदा, ता.धाराशिव येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात पाटोदा व परिसरातील सर्व वयोगटातील 700 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच प्रविण भद्रेयांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुने उपसरपंच कालीदास गायकवाडी, ग्रा.प. सदस्य विनोद केदार, नागनाथ माळी, संदेश माळी, ज्ञानेश्वर ढोले, चेतन्य भद्रे, दादासाहेब लोदगे, काकासाहेब निलंगेइत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ स्नेहा आंतुरे, डॉ. आश्विनी जाधव, डॉ.कृष्णा होडे पाटील, डॉ.जयेश पाटील, डॉ. शिवम येवरे पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमीन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे, व पाटोदा आरोग्य केंद्राच्या रुपाली नागटीळे, विद्या दुधंबे, गंगाबाई कांबळे, कस्तुरा माने यांनी परिश्रम घेतले