तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनार्थ येणार्‍या  व्ही. आय. पी. ना देवी दर्शन घेण्यासाठी आता दोनशे रुपये प्रतिपास मोजावे लागणार आहेत. अभिषेक पाससाठी ही दरवाढ केली असुन याची अमंलबजावणी 10 जुलै 2023 पासुन करण्याचे आदेश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त समिती सभा दि. 03/12/2022 ठराव क्र. 01 अन्वये श्री तुळजाभवानी मंदिरातील व्ही.आय.पी. दर्शन पासमध्ये विश्वस्त कोटा

प्रति व्यक्ती रु.200 रूपये फीस आकारणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले आहे. तसेच मा. विश्वस्त समिती सभा दि,19/05/2023 ठराव क्र. 07 अन्वये श्री तुळजाभवानी मंदिरातील एका अभिषेक पुजेसाठी 05 व्यक्ती श्री देविजींचे गाभार्‍यात सोडण्यात येतात. यासाठी रु.50 रूपये ऐवजी रु.500 रूपये फीस आकारण्यात यावी असे सर्वानुमते ठरले. परंतू काही तांत्रिक कारणास्तव सदर दोन्ही ठरावांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तथापी, दि. 10/07/2023 वार सोमवार रोजी पासून व्ही.आय.पी. दर्शन पासमध्ये विश्वस्त कोटयातून श्री देविजींचे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना रु.200 रूपये फीस आकारण्यात यावी. तसेच एका अभिषेक पुजेसाठी 05 व्यक्तींना रु.500/- फीस आकारण्यात येऊन ठरावांची अंमलबजावणी करण्यात येऊन वरील दोन्ही ठरावांची अंमलबजावणी केल्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.असे आदेश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

 
Top