नळदुर्ग (प्रतिनिधी)-नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासह लिंगोध्दभव मूर्ती, बसवश्रृष्टी, ग्रंथालय, अनुभव मंडप प्रतिकृती, ध्यान केंद्र यासह बाग-बगीचा विकसित करण्याबाबत लिंगायत समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींसमवेत आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे बैठक घेऊन त्यांच्या सूचना व कल्पना जाणून घेतल्या.
राष्ट्रीय महामार्गालगत नळदुर्ग येथे गोलाई नजीक गायरान व वनविभागाची जागा असून तेथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी केवळ पुतळाच उभारण्यात येणार नसून वस्तुसंग्रहालय, लाईट अँड साऊंड शो, भक्तांसाठी निवासस्थाने, लिंगोध्दभव मूर्ती, बसवश्रृष्टी, ध्यानकेंद्र, ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. गायरान जमीनीवर पुतळा, मूर्ती व इतर बांधकाम करण्यात येणार असून वनविभागाच्या जागेमध्ये बागबगीचा व इतर बाबी करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी जागेची पाहणी केली असून याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील वास्तुविशारदांना देण्यात आलेल्या आहेत.
सदरील बैठकीस भाजपा नितीन काळे, जेष्ठ नेते रेवणसिध्द लामतुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अॅड. दिपक आलुरे, शेखर मुतकन्ना, वसंत वडगावे, संजय बताले, सागर मुंढे, काशिनाथ शेटे, विजय शिंगाडे, सिद्धेश्वर कोरे, महादेव पाटील, दयानंद मुडके, राज पाटील, गिरीश शेटे, युवराज पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.