उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या डान्सबारवर कळंबचे सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी धाड टाकली. यावेळी बारमधील 9 महिलांकडून बारमधील आरोपीसमोर अश्लिल हावभाव करून नृत्य करून सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन स्टेजवरील नृत्य करणार्‍या महिलांवर उडवत अश्लिल हावभाव व नृत्य करीत होते. यांचेकडून रोख रक्कम 1 लाख  5 हजार 830 रुपये व 7 कार, 4 मोटार सायकल, 29 मोबाईल व सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन असे एकुण 58 लाख 51 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 35 जणांविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेशाने व अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.7) पहाटे दोनचे दरम्यान कळंबचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. रमेश हे जकेकुर चौरस्ता शिवारातील उमरगा लातुर रोडलगतचे सौदागर बार व रेस्टारंट येथे नियमांचे उल्लंघन करून बार चालु ठेवुन बारमध्ये अवैधरीत्या महिला नृत्यांगनावर पैसे उधळुन अश्लिल व बिभत्स हावभाव करून नृत्य चालु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उमरगा पोलिस स्टेशनमध्ये येऊन येथील अधिकारी व अंमलदार यांचेसह सौदागर बार व रेस्टॉरंट येथे छापा मारला. यावेळी सौदागर ऑर्केस्ट्रा व रेस्टॉरंटमध्ये बार मॅनेंजर, कामगार यांनी शासनाने नेमुन दिलेल्या नियमावलीचे व परवानाचे उल्लंघन करून उशीरापर्यत बार चालु ठेवुन बारमध्ये मोठ्या आवाजात म्युझीक सिस्टीमवर गाणे लावुन 9 महिलांकडून बारमध्ये उपस्थित इतर आरोपी यांचे समोर अश्लिल हावभाव करून नृत्य करून सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन स्टेजवरील नृत्य करणार्‍या महिलांवर उडवत अश्लिल हावभाव व नृत्य करीत असताना मिळुन आले. यातील बार चालकासह एकुण 35 जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीच्या कब्जातुन रोख रक्कम 1 लाख 5 हजार 830 रूपये व  7 कार, 4 मोटार सायकल, 29 मोबाईल व सौदागर हॉटेल टेन लव्हर्स नावाचे कागदी कुपन असे एकुण 58 लाख 51 हजार 680 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरची कामगिरी. एम. रमेश सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली कळंबचे पोउपनि पुजरवाड, पोकॉ फतेपुरे, पोको तारळकर, पोकॉ गायकवाड, पोहेकॉ  शिंदे सर्व ने. पो.स्टे. कळंब व पोना शेख, पोकॉ भांगे, पोकॉ पठाण, पोकॉ खांडेकर, पोकॉ  गरड, पोकॉ राऊत, पोकॉ चव्हाण, पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, सपोनि महेश क्षीरसागर, पोहे मुंडे, पोहे सुनीता राठोड यांनी कारवाई केली.


 
Top