धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र कृषी दिनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कळंब तालु्नयातील कन्हेरवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात कृषी क्षेत्रात चांगले काम करणार्‍या  शेतकर्‍यांचा  सत्कार करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांचे महाराष्ट्रातील शेतकजयांसाठी व कृषी विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते. त्याचमुळे स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून यावेळी आनंद मिटकरी या युवकाचा बीएससी कृषी पदवी घेऊन शेतकर्‍यांसाठी चांगले काम करत असल्याबाबत सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा गायकवाड, सुभाष कवडे, वैजीनाथ कवडे, रामभाऊ कवडे, पांडुरंग जाधव आदींचा दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे वक्ता विभाग तालुकाध्यक्ष प्रा. रणजित वरपे, विशाल मिटकरी, चंद्रकांत जाधव, धर्मराज कवडे, सुरेश कवडे, विलास जगताप, वसुदेव सावंत, जालींदर कवडे, दत्तात्रय शिंदे, दयानंद जग्ताप, रामभाउ कवडे, कमलाकर नारायण कवडे, बाळासाहेब कवडे, पांडूरंग जाधव, विठ्ठल धोंगडे, विश्वनाथ गायकवाड, श्रीकांत मिटकरी, प्रसाद कवडे, अरुण सावंत, बादल सावंत, अनंत कवडे, बाळासाहेब कवडे, अंगद कवडे, श्रीनाथ मिटकरी, रणजीत ओमन आदी उपस्थित होते.


 
Top