परंडा (प्रतिनिधी) - श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे परंडा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील नाथ चौकात पालखी सोहळ्याचे आगमन झाले. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, न.प. मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यासह मान्यवरांनी वारकर्‍यांचे स्वागत केले.

शहरात ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले. उद्योजक नितीन भोत्रेकर यांच्या वतीने वारकर्‍यांना बिस्किट, चहा व झंडूबाम मलम यांचे वाटप करण्यात आले. मनोज चिंतामणी यांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हंसराज गणेश मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी अमित जोशी, रोहित भोत्रेकर, राहुल देवळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवार पेठेतील मोहन देशमुख यांच्या निवासस्थानी पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.


 
Top