धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे मार्फत ग्रामीण भागातील कॅन्सर, हृदयरोग व किडनीचे आजार अश्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना रु. 15 हजार रुपये आर्थिक मदत फक्त एक वेळेस देण्यात येते. तरी जिल्हयातील ग्रामीण भागातील गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे. आरोग्य विभाग जिल्हा
परिषद उस्मानाबाद येथे अर्ज स्विकारल्या जात असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित रुग्ण हा उस्मानाबाद जिल्हयातील रहिवाशी असणे गरजेचे असुन रुग्णालयाचे निदान प्रमाणपत्र, आधार कार्ड, राष्ट्रियकृत बॅकेचे पासबुक झेरॉक्स, यापुर्वी लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणा पत्र ई. कागदपत्रासह अर्ज करावा. सदर योजनेची माहिती गामीण भागातील सर्व नागरीकांपर्यंत पोहचणेसाठी सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, सामाजिक संस्था ई. यांनी प्रसिध्दी करुन जास्तीत जास्त रुग्णांना लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे.