नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गच्या प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्यात दरवर्षी दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे दि. जुन रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात पाहणी दौर्‍यासाठी आले होते. त्यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन डॉ. गर्गे यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यांतील अनेक किल्ल्यांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी आहे. बहुसंख्य किल्ल्यांमध्ये शासनाकडुन शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नळदुर्गच्या प्राचीन व ऐतिहासिक किल्ल्यामध्येही दरवर्षी दि. फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची आपल्या विभागाची किंवा आपल्याकडुन परवानगी मिळावी. नळदुर्गचा किल्ला हा महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला आहे की त्याचे क्षेत्रफळ हे सर्वात मोठे आहे. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजन्मोत्सव साजरा होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, संतोष पुदाले, भगवंत सुरवसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top