कळंब (प्रतिनिधी)-पांडुरंगाच्या भक्तीची परंपरा असलेल्या कुटुंबातील सदस्य म्हणून व वडिलांनी आषाढी वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना अन्नदान करण्याची जी परंपरा सुरू केली आहे त्यांचे आशीर्वाद व सेवा रूपाने   पुढे सुरू ठेवले आहे . यासाठी माझे कुटुंबीय यांची सेवा, सहकार्य माझ्याबरोबर आहे असे  सुरेश रामभाऊ कल्याणकर यांनी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देत असताना व्यक्त केले. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष होते.

जैन मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हभप. महादेव महाराज अडसूळ हे होते. प्रास्ताविक सतीश टोणगे यांनी केले. यावर्षीचा अन्नदान पुरस्कार कळंब येथील अन्नदाते सुरेश कल्याणकर यांना ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हभप. महादेव महाराज अडसूळ व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर मोरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, यांच्या शुभहस्ते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या गजरात  मानपत्र, शाल, टोपी, वृक्षाचे रोपटे, देऊन  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सुरेश कल्याणकर व त्यांच्या पत्नी सुमित्रा कल्याणकर यांनी स्वीकारला. याप्रसंगी हभप. महादेव महाराज अडसूळ, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी कल्याणकर कुटुंबीय हे धार्मिक कार्यात तसेच वारकरी परंपरा असलेले कुटुंब असून त्यांची सेवा अखंड सुरू आहे. त्यांच्या हातून हे सत्कार्य होत आहे. या स्वरूपाची सेवा सर्वांनी करण्याची गरज असल्याचे  सांगून अन्नदाना चे महत्व विषद केले.  

याप्रसंगी कळंब तालुका पत्रकार संघाचे सतीश  टोणगे , शितलकुमार घोंगडे, शिवप्रसाद बियाणी, शिवाजी सावंत ,सुनील देशमुख, डॉ. श्रीहरी मुळे , बापू भाकरे नामदेव पौळ, कल्याणकर कुटुंबीय प्रा. डॉ. अमोल कल्याणकर, महेश कल्याणकर यांच्यासह .कुटुंबीय व भक्तांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत तर आभार डॉ. रमाकांत कल्याणकर यांनी मानले.

 
Top