उमरगा (प्रतिनिधी)- ज्या पित्याने जन्माला घातले, त्याच पित्याने पोटच्या 15/16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर सतत तीन चार महिने लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी तीन महिन्याची गरोदर राहिली. समाजाला व वडिलांच्या नात्याला कलंकित करणारी घटना उमरगा तालुक्यातील एका गावात चार दिवसापूर्वी घडली. या प्रकरणी या नराधमाला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता प्रथम त्याला पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयात नेण्या आल्यानंतर त्यसाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, उमरगा तालुक्यातील एका पुढरालेल्या मोठया गावातील 45 वर्षे वयाच्या वडील असणार्या दारुड्या व लिंग पिसाटाने आपल्याच अल्पवयीन 15/16 वयाच्या मुलीवर सतत तीन चार महिने लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीला धमकी देत कुणालाही वाच्यता न करण्यासाठी सांगायच. ही बाब पीडित मुलीच्या त्या दुर्दैवी मातेला माहिती नसल्याचे सूत्राकडून समजले. दरम्यान ही अल्पवयीन
मुलगी गरोदर राहिल्याने तिच्या पोटात सतत दुखायचे. यानंतर या पीडित मुलीची खाजगी व शासकीय रुग्णालयात पालकांनीच सोनोग्राफी करून तपासणी केली असता, सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. हरामखोर पित्याने मुलीला धमकी देत त्या गावातील पोलीस ठाणे गाठून, एका दोन मुलामुळे मी गर्भावती झाल्याचा बनाव करून तक्रार देण्यास सांगितले. दरम्यान पोलीस तपासात ही बाब खोटी निघाली. महिला पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेत माहिती विचारली असता, वडिलांनीच हे नीच कृत्य केल्याचे उघड झाले. पोलिसांनी वरिष्ठ्यांच्या मार्गदर्शनाखाली पॉकसो व बलात्काचा गुन्हा दाखल करून हरामखोर वडिला अटक केली. न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता, तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. त्या नंतर आरोपीला जेलला पाठविण्यात आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी उप विभागीय पोलीस अधीकारी रमेश बरकते यांनी सांगितले.