परंडा (प्रतिनिधी)- विद्यार्थी दशेत कष्टाला पर्याय नाही. शालेय शिक्षण घेत असताना घरच्या प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जात अभ्यासात सातत्य ठेवल्यास उच्चशिक्षित होण्यासाठी यशाला गवसणी घालता येते.पालकांनीही आपल्या मुलांचा कल पाहुन आवडीच्या क्षेञात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत जि.प.माजी विद्यार्थीनी पुणे येथील प्रा.डॉ.साधना देशपांडे यांनी व्यक्त केले.

येथील  जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे शुक्रवार ता. रोजी  दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणार्‍या गुणवंत मुलामुलींचा परंडा सेवा मंडळाकडून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्रा. डॉ.साधना देशमुख- देशपांडे (पुणे) यांची उपस्थिती होती. यावेळी राज्याचे माजी कृषी संचालक जयंत देशमुख, जेष्ठ महिला सरलाताई महाजन, मधुकर लोखंडे, कमल वाघमारे, मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, आलमगीर सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थीनी तृप्ती अविनाश निकाळजे,निकिता संतोष शिंदे, प्रज्ञा सुभाष बनसोडे, तसेच जिल्हा परिषद प्रशाला परंडा येथील विद्यार्थी बालाजी हनुमंत काळे, अभिजित रमेश शिंदे, सलीम युनूस शेख, वरील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक 2500, द्वितीय क्रमांक 2000 व तृतीय क्रमांक 1500 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. जि.प.चे माजी विद्यार्थी प्रा.अविनाश वाघमारे इजिनियरींग कॉलेज पुणे यांच्याकडून दोन्ही प्रशालेतील चालू वर्षी शिक्षण घेत असलेल्या इयत्ता नववी व दहावी मधील एकूण 14 मुलामुलींना दहा हजार दोनशे रुपये किमंतीची शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. महेश भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बबन गवळे,शिक्षक नामदेव पखाले, सतीश खरात, आबासाहेब माळी, तानाजी मिसाळ, बाबुधी घाडगे, मिनाक्षी मुंढे, शुभदा पाटील, गीता देशमुख, रेखा ऊसराटे, गीता मंडलिक, अब्दुल गनी हन्नुरे, आनंद देशमुख आदिसह पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले. तर आभार  विशाल काशीद यांनी केले.


 
Top