धाराशिव (प्रतिनिधी)-शहरात 16 जूनच्या रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोदी ऽ 9 या अंतर्गत सभेचे आयोजन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. जि. प. कन्या प्रशालेच्या मैदानावर झालेल्या सभेतून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन दाखवल्याचे मानले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच धाराशिवला येवून गेले. त्यांनी तुळजापूर व धाराशिव तालु्नयात भेटी देवून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी सभेचे आयोजन धाराशिव शहरात करण्यात आले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांच्या विषयी आदरणीय व अतुलनिय नेते असा उल्लेख केला. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्नही समोर मांडले. वैद्यकीय संकूल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग यासह त्यांनी अनेक विकसाचे प्रश्न मांडले आणि फडणवीस यांचे लक्षवेधून घेतले. आ. पाटील यांनी फडणवीस यांना चांदीचा गदा, तुळजाभवानीची प्रतिमा व गोरोबा काकांची मुर्ती भेट देऊन सत्कार केला. त्यानंतर युवक, बंजारा महिलावर्ग, शेतकरीवर्ग यांनी पण फडणवीस यांचा मंत्री मंडळाने घेतलेल्या काही निर्णयाबाबत आभार मानले. यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कृष्णा खोर्‍यातील पाणी औस्याला पण द्या अशी मागणी करून टेभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर या मार्गाचे  चौपदरीकरण करण्याची मागणी केली. तर बार्शीचे आ. राजाभाऊ राऊत यांनी जिकडे बार्शी तिकडे सरशी असे म्हणत लोकसभेला कोणताही उमेदवार द्या आम्ही शंभर टक्के निवडून देवू असे सांगितले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या झंझावती भाषणात कर्नाटक मध्ये ज्याप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. सावरकर व हेगडेवार यांचे धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले हे मतसाठी असलेला कर्नाटक पॅटर्न उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का?  असे म्हणून ठाकरे यांंच्यावर सडकून टिका केली. आमचे सरकार लोकांच्या दारात जाते तर ठाकरे सरकाराचा उल्लेख खुद्द शरद पवार यांनीच फेसबुक सरकार असे केल्याचे सांगितले. फडणवीस यांच्या दौर्‍यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती येण्यास वाव मिळाल. तर आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे मंत्रीपद निश्चित झाले यांचेही संकेत या सभेने दिले आहेत. 


 
Top