वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, संस्थेचे कार्यकारणी सदस्य तथा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस.के मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे उपस्थित होते. 

या वेळी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या प्रत्येक शाखेमधील प्रथम व्दितीय व तृतीय आलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयकुमार शितोळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करून घेणे गरजेचे आहे.तसेच महाविद्यालयातील ग्रंथालय, विविध साधने,तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन यश मिळवावे.यापुढे विज्ञान विभागाकडील गुणवत्ता आणखी वाढवण्याचे प्रयत्न शिक्षकांनी करावे असे आवाहन केले. यावेळी महाविंद्यालयाचे माजी प्राचार्य एस. के. मोरे, प्राचार्य डॉ. रविंद्र कठारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुणवंत विद्यार्थींनी कु. रेणुका विनायक टेकाळे हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विज्ञान विभागाचे  समन्वयक  प्रा. अजित तिकटे यांनी केले तर प्रा.डॉ.संजय माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.


 
Top