नळदुर्ग (प्रतिनिधी)-बोरमनतांडा येथे पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे जळकोट ग्रामपंचायतीने तातडीने निर्णय घेत  दि. 17 जून  रोजी नवीन बोअर घेण्यात आले. बोअरला जवळपास 4 इंच पाणी लागले आहे. 

गेल्या का कांही दिवसांपासून पाऊस लांबणीवर पडल्याने सर्वत्रच पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. गावांच्या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी ज्या साठवण तलावात आहेत त्यांचीही पाणीपातळी कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत बोरमन तांडा जळकोट येथील जुन्या बोअरचे पाणी कमी झाल्याने तेथील नागरिक व महिलांनी काल जळकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सदस्यांची भेट घेतली व तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत विनंती केली. यावेळी ग्रा पं. सदस्य प्रा. गजेंद्र कदम यांनी तातडीने नवीन बोअर घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले  .                            याबाबत उपसरपंच प्रशांत नवगिरे व  ग्रा.पं. सदस्य प्रा गजेंद्र कदम यांनी तात्काळ  बोरमन तांडा येथे नवीन बोअर घेण्यावा निर्णय घेतला. 

 दि. 17 जून  रोजी नवीन बोअर घेण्यात आली. बोअरला जवळपास 4 इंच पाणी लागले आहे. 

सरपंच अशोकराव पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी उपसरपंच प्रशांत नवगिरे ग्रा. पं. सदस्य गजेंद्र कदम, जयश्री भोगे, बसवराज कवठे, कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे, यांच्यासह महेश कदम, कृष्णात मोरे, नामदेव कागे, बसवराज भोगे, राजु पाटील, राजु चव्हाण, मोहन चव्हाण, बाबु चव्हाण व महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरमन तांडा येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले.

 
Top