सोलापूर (प्रतिनिधी)-जुन महिना संपत आला तरी पावसाला अजून ही सुरुवात झाली नाही.वाढत्या  भीषण गरमीमुळे सामान्य रेल्वे डब्यातील प्रवाशांची गर्दी आणि गाडीचा थांबण्याचा वेळ दोन ते तीन मिनिटांचा असतो अशा वेळेस  प्रवाशांना पिण्यासाठी पानी मिळत नाही. त्यांची भटकंती होते आणि गाडी सुटून जाते.  अशा वेळेस  धावत्या गाडीत चडल्यामुळे अपघात होऊ शकतो.  ही परिस्थिती लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने प्लॉट फार्मच्या दोन्ही टोकावर जा ठिकाणी जनरल कोच थांबतो त्या ठिकाणी निशुल्क सेवा म्हणून थंडगार पिण्याच्या पाण्याचे जार तात्पुरत्या स्वरूपात बसविले आहे.

थंड पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था सोलापूर, कलबुर्गी, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, लातूर इत्यादि रेल्वे स्थानकावर  कण्यात आली आहे.

 
Top