धाराशिव (प्रतिनिधी) - कळंब शहर व तालुका हद्दीत अजमेरा कंट्र्नशनच्या माध्यमातून सुरु असलेली रोडची कामे निकृष्ट असून त्या कामांची चौकशी करावी. तर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 26 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 

कळंब शहर व तालुका हद्दीतील रोडची कामे अजमेरा कंट्र्नशनच्या माध्यमातून सुरू आहेत. ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे त्या कामांची चौकशी करावी व संबंधित अधिकार्‍यांवर अशी मागणीसाठी वारंवार निवेदनाद्वारे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली. मात्र त्या निवेदनाची दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या कामांची चौकशी करावी व संबंधित अधिकारी व कन्ट्रक्शनवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विठ्ठल यादव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, शहराध्यक्ष ज्योतीराम काळे, महेश साठे व ऋषिकेश साळुंके आदी उपस्थित होते.


 
Top