कळंब तालुका शिवसेनेच्या( ठाकरे) गट संघटक पदी संजय संदिपान  होळे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या निवडीचे पत्र शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी दिली.

पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करताल अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, मा. जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब जाधवर, प्रा. दिलीप पाटील दिनकर काळे, अतुल कवडे श्याम नाना खबाले, संतोष लांडगे, गोविंद चौधरी, नामदेव  पौल, सुरेश शिंदे, रोहन पारख, जिलानी कुरेशी आदि उपस्थित होते. संजय होळे हे स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी असून त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top