तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील आचार्य कूटूंबात पाचव्या पिढीपासून चालत आलेला श्रीमद् भागवत सप्ताहास 27 जूनपासून प्रारंभ झाला.
श्रीमद् भागवत सप्ताहाचा शुभारंभ मंत्रोच्चारात करण्यात आला.सकाळी संहिता वाचन, दुपारी अर्थनिरूपण, सायंकाळी आरती असा दिनक्रम आहे. श्रीमद भागवत कथेचे अर्थनिरूपण ह.भ.प.बाळासाहेब आचार्य करतात.