धाराशिव (प्रतिनिधी)-लक्ष्मी नारायण अपारमेंट प्लॉट नं 201, अमरावती येथील- राजगोपाल हरिहर गुल्हाने, वय 43 वर्षे हे सोबत कुटुंबासह ट्रायव्हल्स क्र एम एच  14 डी जी 7662 सह अक्कलकोट येथे जात होते. दि.02.06.2023 रोजी 05.00 ते 06.00 वा. सु पारगाव टोलनाका ते उपळाई पाटी दरम्यान अज्ञात 4 व्यक्तीने ट्रायव्हल्सच्या वर दोरीने बांधलेल्या 10 बॅगपैकी दोन कपडयाच्या बॅग व लाल रंगाचे सुटकेस मध्ये ठेवलेले 15 तोळ्याचे सुवर्ण दागिणे, 358 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे व रोख रक्कम 3,000  असा एकुण 6,26,400 रू. किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन राजगोपाल गुल्हाने यांनी येरमाळा पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दि.15.06.2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा येथील एक व्यक्ती जवळ चोरी केलेले सोन्या, चांदीचे दागिणे आहेत. अशी खात्रीलायक बातमी  मिळाल्याने  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर ठिाकाणी एक व्यक्ती दिसला त्याला त्याचे नाव गाव विचारले असता तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे पथकास समजले. त्याच्याकडे नमुद गुन्हयातील सोन्या, चांदीचे  दागिण्या बाबत विचारपूस केली. असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचे कडे अधिक चौकशी केली असता तो व त्याचे अन्य 3 साथीदार यांनी वर नमूद गुन्ह्यातील माल चोरी केल्याचे सागिंतले. त्यावर पथकाने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वर नमूद गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिणे असा  एकुण  2, 31, 000  किंमतीचा माल जप्त केला. सदर विधीसंघर्षग्रस्त  बालकास चोरीच्या मालासह पुढील कारवाईस्तव येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. व त्याच्या अन्य 3 साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत  यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलंगेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी,  पोलीस अंमलदार पठाण, काझी, औताडे, शैला टेळे, यांच्या पथकाने केली आहे.

 
Top