धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम 2019 ला आमच्याच काळात सुरू झाले होते. या कामासाठी साडेअकरा हजार कोटी रूपये आम्ही मंजूर करून उपलब्ध करून देत आहोत. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी साडेचारशे कोटी रूपये सरकार उपलब्ध करून देत आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील या सर्व कामासाठी अग्रही आहेत. त्यामुळे गेल्या वीस वर्षाचा रेल्वे संघर्ष समितीचा संघर्ष संपून हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल. त्याचप्रमाणे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे मराठवाड्यातील एकूण 24 हजार हे. जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतानी दिली. 

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तुळजापूरला यात्रा अनुदान वाढून देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचा योग्य विचार करून आई तुळजाभवानीला काय मागितले असे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी आई ही श्नतीची देवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या हातून जनसामान्य लोकांच्या जीवनात सामाजिक,आर्थिक परिवर्तन घडो. त्याच प्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही श्नती देवो, अशी मागणी केली असल्याचे सांगितले. लोकसभा मतदार संघा संदर्भात बोलताना भाजपाची केंद्रीय कमिटी आहे. याबाबत कमिटी व मुख्यमंत्री शिंदे एकत्र बसून निर्णय घेतली असे असून, मंत्री मंडळाचा विस्तारही लवकरच  होईल असे सांगितले.



तुळजाभवानी मंदिरात विकासाचे सादरीकरण

महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. 16 रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येवुन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जावुन दर्शन घेतले.  यावेळी  त्यांनी देविजीची साडीचोळी पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. देवीदर्शना नंतर भरपूर पाऊस पडू दे महाराष्ट्रात सुखसमृध्दी नांदु दे असे साकडे देविचरणी नतमस्तक होवुन घातले.

त्यानंतर होमकुंड दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील पाच पायर्‍या बसुन देविजीची आराधना केली. त्यांच्या पुजेचे पौराहित्य पुजारी विशाल रोचकरी यांनी केले उपमुखमंञी देंवेद्रफडणवीस यांना देविचे  महंत वाकोजीबुवा यांनी आशीर्वाद दिला यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, औसा आ. अभिमन्यु पवार, प्रविण दरेकर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नितीन पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरशन चेअरमन नारायन नन्नवरे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, आनंद कंदले, राजशेखर कदम, सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधिक्षक अभियंता भारत शिंगाडे, सह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top