धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात दिव्यांग बंधू- भागिनींवर वाढलेल्या अन्याय व अत्याचार विषयी कठोर अंमल बजावणी करणे यासाठी व त्यांच्यावरील होणारा अन्याय उदाहरनार्थ दिव्यांग व्यक्तींची फसवणूक,दिव्यांग व्यक्तीवर होणारी दाब दडपशाही,शेती विषयक प्रश्न, समाजात दिव्यांगावर होणारा अन्याय ,आपमाणस्पद वागणूक,दिव्यांग महिलांवर होणारे आत्याचार व कौटूबिक अडी-अडचणी तसेच दिव्यांग शैक्षणिक संस्थेत होणारी हेळसांड यावर दिव्यांग कायदा 2016 च्या अॅट्रॉसिटी कायद्यानुसार पोलीस प्रशासनांकडून या बाबींची भूमिका अतिशय महत्वाची असून बर्‍याचदा पोलीस प्रशासनांकडून या बाबींची दखल गांभीर्याने घेतली जात नाही. तासनतास पोलीस स्टेशनला दिव्यांग बांधव ताटकळत उभे राहावे लागते. या विषयी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे बैठक लावून दिव्यांग व्यक्तीस न्याय द्यावे.

अशा आशयाचे निवेदन प्रहार संघटना व राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या वतीने देण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,राष्ट्रवादी सेल चे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, महादेव चोपदार, रियाज पठाण, बाळासाहेब पाटील, महेश माळी, विठ्ठल चव्हाण, संजय शिंदे, शिवकुमार माने, इंद्रजित मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top