तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने बाहेर राज्यामध्ये घातलेल्या कांद्याचा अनुदान देण्यात यावे. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावं गोपीनाथ मुंडे विमा मिळत नसल्याने ताबडतोब देण्यात यावा या
मागणीसाठी सोमवार दि.12 जून रोजी येथील जुन्या बसस्थानक समोर रस्तारोको आंदोलन केले. या रस्तारोको आंदोलना मुळे धाराशिव नळदुर्ग लातुर सोलापूर बार्शी या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती.
धाराशिव-नळदुर्ग-सोलापूर लातुर महामार्ग रस्त्यावर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करुन शिवसैनिक घोषणा देत बसस्थान चौकात येवुन रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी या सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी आंदोलन स्थळी येवुन नायब तहसिलदार पांचाळ व अमर गांधले यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारुन शाषणाला आपल्या मागण्यांचे निवेदन, पोहचविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे पवार, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, कमलाकरराव चव्हाण, उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सुनील जाधव, संजय भोसले, सुधीर कदम, शिवसेना गटप्रमुख समाधान ढवळे, विभाग प्रमुख धुळाप्पा रक्षे, महेंद्र सुरवसे, बालाजी पांचाळ, अमोल घोटकर, मेहबूब पठाण, श्याम माळी, अमोल गवळी, सरपंच महादेव पवार, मीडिया प्रमुख चेतन बंडगर, सिद्राम आप्पा कारभारी, राजेंद्र जाधव, शिवाजी कदम, सरपंच संजय चव्हाण, पिनू भोसल, मुकुंद गायकवाड, शिवाजी रोडे आदीसह शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोनि. अदिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.