तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंञी  देंवेद्र फडणवीस यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येवुन श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन घेतल्या नंतर मंदिर प्रशासकीर कार्यालयात विविध विकास कामांबाबतीत निवेदन नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे यांनी  दिले.

यावेळी यामध्ये प्रामुख्याने हुतात्मा चौक ते पावणारा गणपती रस्ता रुंदीकरण व भुसंपादन करावे, तुळजापूर तीर्थक्षेत्रासाठी नवरात्र यात्रा अनुदानात भरीव  वाढ करावी, नगर परिषद मधील विविध महत्त्वपूर्ण कर्मचारी पदे भरण्यात यावी, नगर परिषदेचे 2019 व 20 चे प्रलंबित यात्रा अनुदान तात्काळ मिळावे, अशा विविध विकास मागण्यांचे निवेदन देण्यात आले

यावेळी प्रलंबित  याञा  अनुदान व वाढीव  याञा  अनुदान  देण्याबाबतीत  सकारात्मक निर्णय  घेण्याचे आश्वासन  दिले.

 
Top