धाराशिव (प्रतिनिधी)-2009 ते 2014 या कालावधीत तत्कालीन केंद्र सरकारने महाराष्ट्राला  रेल्वेसाठी फ्नत 1100 कोटी रूपये दिले होते. परंतु 2014 नंतर आलेल्या मोदी सरकारने महाराष्ट्राला आतापर्यंत साडे बारा हजार कोटी रूपये दिले आहेत. यामधून प्रलंबित रेल्वे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार असून, नगर-बीड हा रेल्वे मार्ग 2024 पर्यंत तयार करण्यात येईल असे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

यावर्षी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटी रूपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यावर रेल्वे विभागाचा भर आहे. महाराष्ट्रामध्ये इले्नट्रीक रेल्वे मार्गाचे काम 90 ट्नके पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रात इले्नट्रीक काम पूर्ण होईल असेही दानवे यांनी सांगितले. सरळ शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करण्याच्याबाबत बोलताना रेल्वे विभाग सरळ शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करू शकत नाही. हे काम रेल्वे विभागाचे नाही. शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असेही मंत्री दानवे यांनी सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाबाबत बोलताना सांगितले. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी उपस्थित होते.

 
Top